Type Here to Get Search Results !

विद्यार्थी सुरक्षा मराठी माहिती | Student Security IN Marathi Mahiti

 विद्यार्थी सुरक्षा मराठी माहिती |  Student Security IN Marathi Mahiti 


प्रस्तावना


Student Security IN Marathi Mahiti मित्रांनो आज-काल शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. आज आपण विद्यार्थी सुरक्षा मराठी माहिती Student Security IN Marathi Mahiti या विषयावर महत्वपूर्ण शासन निर्णयावर आधारित विद्यार्थ्यांची सुरक्षा च्या संदर्भात ब्लोगर ने ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी हा विषय हाती घेतला आहे. Student Security IN Marathi Mahiti 



विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने जी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत .त्या सूचनांचं पालन करण्याच्या अनुषंगाने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक आणि अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या अनुषंगाने महत्वपूर्ण खबाबदारीची जबाबदारी शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे.Student Security IN Marathi Mahiti 

Student Security IN Marathi Mahiti
 Student Security IN Marathi Mahiti 


आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासन निर्णय निर्गमित करून विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने शासनाने उचललेले महत्त्वाचे एक पाऊल आहे Student Security IN Marathi Mahiti संदर्भाने आपण या लेखात शासन निर्णयातील संपूर्ण माहिती स्पष्टपणे नमूद करत आहे. 


विद्यार्थी सुरक्षा मराठी माहिती Student Security IN Marathi Mahiti 


या विषयावर निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया.हा शासन निर्णय शाळा मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यासंदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय विद्यार्थी सुरक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्यामुळे या विषयावर या लेखातून सविस्तर चर्चा करूया.

 

शासन निर्णय स्पष्टीकरण 


आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 13 डिसेंबर 2025 चा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा स्तरावर एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत.या शासन निर्णयाच्या सुरुवातीला आहे .ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय. राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने केंद्र शासनाने विद्यार्थी सुरक्षा संदर्भात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा पालन करणे बंधनकारक आहे .'Student Security IN Marathi Mahiti '


बालकाचा मोफत व सक्तीचा निर्णय 


Student Security IN Marathi Mahiti सर्व संस्था चालक, व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी प्रामुख्याने खालील नमूद मुद्द्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी .बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 केंद्र शासनाने विद्यार्थी सुरक्षा संदर्भात निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे.राष्ट्रीय व राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने बालकांच्या सुरक्षे संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना यांचे पालन करणे अनिवार्य राहील. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा गंभीर शारीरिक दंड अथवा शिक्षा.Student Security IN Marathi Mahiti 


शाळेतील घटनांचे स्पष्टीकरण

 उदाहरणार्थ 

शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते ती पुढील प्रमाणे माहिती देण्यात येत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करतात.

मारणे ,हाताने, काठीने, फुटपट्टीने आणि पट्टा इत्यादी.

 कान व केस वाढणे . उठ-बशा , डकलने , वर्गाबाहेर उन्हात बसवणे आणि विद्यार्थ्यांना मारहाण करून घराकडे पाठवून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी अपमानित होतो.

किंवा पावसात उभे राहण्याची शिक्षा देणे .


भेदभाव करण्याच्या संदर्भातील स्पष्टीकरण 


गुडघ्या वर बसवणे ,भुकेले ठेवणे किंवा पाणी न देणे, अपमान करणे अर्थात शाब्दिक मानसिक वारंवार नावे ठेवणे, कमी लेखणे इत्यादी किंवा भेदभाव करणे, जात धर्म,भाषा ,लिंग, सामाजिक आर्थिक स्थिती ,विशेष गरजा, शैक्षणिक कामगिरी यांच्या आधारावर अनुज्ञेय असणार नाही. विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक व सौम्य भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे .Student Security IN Marathi Mahiti 


नियोजनबद्ध शाळेचे वर्तन, कार्य आणि नियोजन


वर्गात वेळेचे पालन व नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य राहील. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार देणे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे. वेळेवर वैद्यकीय मदत करणे, विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करणे .इत्यादी बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करण्यात येऊ नये. शाळेच्या आवारात गुंडगिरी ,भेदभावपूर्ण कृती ,मादक पदार्थाचे सेवन करण्यास प्रतिबंध असून याबाबत भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी .Student Security IN Marathi Mahiti 


शिक्षक व विद्यार्थी वर्तणूक 


शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकाने तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळेमध्ये सर्व शालेय घटकाच्या संदर्भाने शिक्षकांचे वर्तन चांगले असावे .अपरिहार्य कारणाशिवाय विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक संदेश, चॅट आणि सोशल मीडिया इत्यादी द्वारे संवाद करण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांचे फोटो, व्हिडिओ ,पालक व संस्थेच्या सक्षम प्राधिकार्‍याच्या परवानगीशिवाय काढणे किंवा वापरणे किंवा वापरण्यास मदत करणे अनुज्ञेय नाही. Student Security IN Marathi Mahiti 


विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबतची माहिती


 उदाहरणार्थ 


गुणपत्रक आणि मूल्यांकन इत्यादी संवेदनशीलतेने हाताळण्यात यावे. कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव, कमीपणाची भावना निर्माण होणार नाही. इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना हिणवले जाणार नाही .याबाबतची काळजी घेण्यात यावी. तक्रार निवारण कार्यपद्धती सुस्पष्ट व पारदर्शक असावी व तक्रारीचे गांभीर्याने निराकरण करण्यात यावे .Student Security IN Marathi Mahiti 

शालेय सर्व मानव घटकाचे वर्तन 


शाळेतील कोणताही व्यक्तीकडून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर अथवा कर्मचारी कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी इत्यादी विद्यार्थी सुरक्षा बाबत झालेले उल्लंघन तात्काळ वरिष्ठांच्या व शासनाच्या अर्थात गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणावे. 

उपरोक्त नमूद मुद्द्यांचे तसेच केंद्र शासनाद्वारे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही निश्चित करण्यात येत आहे .Student Security IN Marathi Mahiti 


अ )शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापक यांची जबाबदारी-


 शाळा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी सुरक्षा संदर्भातील उल्लंघनाच्या घटनेची तात्काळ लेखी नोंद करावी.

 सदर घटनेबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, संबंधित शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात यावी. घटनेची संबंधित प्राथमिक माहिती अर्थात सीसीटीव्ही, तक्रार निवारण उपस्थितीबाबतच्या नोंदणी सुरक्षितपणे जतन करून ठेवाव्यात. घटनेची संबंधित दस्तावेज सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांशी छेडछाड करण्यात  येऊ नये. संबंधित घटनेची प्राथमिक चौकशी करून दोन दिवसाच्या आत शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा . Student Security IN Marathi Mahiti 


गंभीर घटना च्या संदर्भात स्पष्टीकरण व कार्यवाही 


एखादी घटना गंभीर स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा लैंगिक गुण्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 इत्यादी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे, गुन्हा घडल्याचे ,निदर्शनास आल्यास 24 तासांच्या आत संबंधित व्यक्ती कर्मचाऱ्यांनी विरुद्ध  नजीक चार पोलीस ठाण्यात तक्तार नोंदवण्यात यावी. संबंधित तक्रार नोंदवताना सर्व आवश्यक माहिती, अभिलेख, पोलीस प्रशासनास सादर करून सहकार्य करण्यात यावे .सदर घटनेबाबतचा सविस्तर अहवाल तातडीने संबंधित गट शिक्षणाधिकारी ,उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षकाधिकारी यांना सादर करावा .आता महत्त्वाचा मुद्दा आहेत" Student Security IN Marathi Mahiti "


 ब) संबंधित शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी 

शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापक यांनी सादर केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवालाची नोंद करून घेणे. 


बालकाच्या हक्काचे संरक्षण 


 विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात घडलेले एखादे प्रकरण गंभीर स्वरूपाचे म्हणजेच लैंगिक होण्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 बालन्याय  मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 इत्यादी अधिनियमामधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे तसेच गुन्हा घडल्याचे दिग्दर्शनास आल्यास शिक्षणाधिकारी यांनी सदर बाब तात्काळ तपासावी. संबंधित घटनेची संबंधित व उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापक इत्यादी यांची साक्ष नोंदवून घ्यावी .आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तीकडून लेखी निवेदन घेण्यात यावे.Student Security IN Marathi Mahiti शाळेतील सीसीटीव्ही उपस्थितीची नोंद ,आवश्यक असल्यास वैद्यकीय अहवाल व इतर संबंधित दस्तावेज , पुरावे तपासावे. तसेच घटनेची संबंधित कागदपत्रे ,पुरावे, सुस्थितीत असल्याची व छेडछाड  झालेली नसल्याची खात्री करून घ्यावी. बालकांच्या सुरक्षे संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना कायदेशीर तरतुदी तपासून व चौकशी दरम्यान आढळून आलेल्या नोंदी विचारात घेऊन सविस्तर अहवाल संबंधित कर्मचारी घटनेस दोषी आहे किंवा कसे यांच्या शिफारशी सह तत्काळ संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. Student Security IN Marathi Mahiti 


गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबाबत योग्य कारवाई

Student Security IN Marathi Mahiti विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुन्हा मोठ्या स्वरूपाचा असल्यास किंवा गंभीर असल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.गंभीर स्वरूपाच्या प्रकारात मध्ये संबंधित शाळा व्यवस्थापनाने आणि मुख्यध्यापकाने नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा अथवा तक्रार नोंदवली आहे किंवा कसे ?याची पडताळणी करून घ्यावी .अशा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केलेला नसल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक तपासणी करून घटनेची संबंधित व्यक्ती कर्मचारी विरोधी नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करावा .अशा घटनाबाबत संबंधित शाळा प्रशासन अथवा व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात तक्तार केली नसल्याचे दिग्दर्शनास आल्यास अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळण्यात  यावीत. सर्व घटनेबाबतची माहिती तसेच शालेय दस्तावेत, अभिलेख ,सीसीटीव्ही फुटेज इत्यादी तपासण्यात येऊन त्या आधारे संबंधित व्यक्ती कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात यावा. संबंधित शाळा प्रशासनाने व्यवस्थापनाने सदर गुन्ह्याची  बाब लपवण्याचा  अथवा गुन्हाशी संबंधित माहिती अभिलेख सीसीटीव्ही आणि सीसीटीव्ही फुटेज इत्यादी लपविण्याचा अथवा नष्ट  करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिग्दर्शनास येत असल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी ,मुख्याध्यापक तसेच व्यवस्थापनाविरुद्ध देखील गुन्हा नोंदविण्यात यावा .Student Security IN Marathi Mahiti 


विभागीय Suo-moto कारवाई


 एखादी घटना वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी व इतर समाज माध्यमातुन समजल्यास संबंधित शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी .


गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपात कारवाई 


गंभीर गुन्ह्याच्या संदर्भातील संबंधित माहिती बाबत

 गंभीर गुन्ह्याच्या संदर्भातील संबंधित माहिती बाबतघटनेची शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी .तदनंतर  उपरोक्त परिच्छेद क्रमांक 2( ब )मध्ये प्रमोद कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करावी. अशा सर्व घटनांची नोंद विशेष नोंदणी रजिस्टर मध्ये ठेवण्यात यावे. जाणून बुजून चुकीची माहिती अहवाल सादर केल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा गंभीर प्रकरणामध्ये तातडीचे कार्यवाही करण्यास टाळाटाळ ,दिरंगाई किंवा दिशाभूल करणारी माहिती आणि  अहवाल सादर केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्त भंगविषयक कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व शिक्षकांमध्ये व्यावसायिक ,नैतिक आणि शिस्तबद्ध वातावर निर्माण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भातील बाब उद्भवल्यास सदर प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्यासाठी उपरोक्त कार्यपद्धती तयार करण्यात आल्या असून सर्वांनी ती काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण सांकेतांक क्रमांक 2025131757597921 च्या संदर्भाने पाहू शकता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. Student Security IN Marathi Mahiti 


सारांश 

मित्रांनो आजच्या आधुनिक काळात शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य बऱ्याच घटनांमध्ये धोक्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण होत नाही. विद्यार्थ्यांच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊन अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट झाले आहे. अनैतिकतेचे पतन झाले आहेत. आपण जर दररोजचा दैनिक पेपर हातात घेऊन वाचण्यास सुरुवात केल्यास असंख्य घटना आपणास वाचाव्यास मिळतात आणि त्या घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याबाबतच्या आहेत. राज्यभर विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याचे हक्क मोफत शिक्षण हक्क कायद्याने आणि बाल हक्क संरक्षण कायद्याची जाणीव व्हावी म्हणून शासन स्तरावरून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि त्याच शासन निर्णयाचे या लेखांमध्ये उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे माहिती चे स्पष्टीकरण दिले आहे. आपणास हा लेख वाचल्यानंतर आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करावा ही नम्र विनंती . ब्लोगर या ब्लॉग पोस्ट मधून विनंती करत आहे


शासन निर्णय लिंक पुढील प्रमाणे देण्यात येत आहे. 


शासन निर्णय लिंक


FAQ


1) विद्यार्थी सुरक्षा संदर्भात कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? 

उत्तर-विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

2) विद्यार्थी सुरक्षा संदर्भातील शासन निर्णय कोणत्या दिवशी निर्गमित झाला आहे? 

उत्तर-विद्यार्थी सुरक्षा संदर्भातील शासन निर्णय 13 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित झाला आहे.

3) बालकाचा मोफत सक्तीअधिनियम म्हणजेच आरटीई

एक कोणत्या केव्हा महाराष्ट्रात लागू केला आहे?

उत्तर-बालकाच्या मोफत सक्ती अधिनियम 10 एप्रिल 2010 रोजी महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे.

4) विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? 

उत्तर-समाजातली गुंडगिरी आणि शाळेतील बेजाबाबदारपणा आणि अनैतिक कृत्य यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सोशल मीडियाचा सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे.


5) विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राप्त करून देण्यासाठी शासन स्तरावरून कोणकोणते विभाग कार्य करत आहे?

तर-

आर टी इ कायदा.

बाल हक्क संरक्षण कायदा. 

राज्य बाल आयोग 

महिला व बालकल्याण विभाग विभाग 

समाज कल्याण विभाग 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

शाळा व्यवस्थापन समिती 

राज्य महिला आयोग 

हे सर्व विभाग विद्यार्थ्यांची सुरक्षा प्राप्त करून देण्यासाठी या विभागांची सरकारने नियुक्ती केली आहे आणि नियुक्ती द्वारे विद्यार्थ्यांना संरक्षणाची हमी देण्यात येत आहे 


विविध विषयावर आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

सेवानिवृत्ती वय मराठी माहिती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.